चंदगड येथील सर्वोदय वाचनालय इमारतीसाठी निधी देणार - आमदार राजेश पाटील, ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

21 August 2022

चंदगड येथील सर्वोदय वाचनालय इमारतीसाठी निधी देणार - आमदार राजेश पाटील, ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन

चंदगड येथील सर्वोदय वाचनालयाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करताना आमदार राजेश पाटील व इतर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           चंदगड येथील सर्वोदय वाचनालयाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक शांताराम गुरबे यांनी केले. आमदार श्री पाटील यांनी वाचनामुळे समाज प्रगल्भ बनतो. आजकालच्या मोबाईलच्या जगात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. तीची जपणूक होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तालुक्याच्या ग्रंथालयाची इमारत ही फारच छोटी आहे. त्यामुळे इमारत बांधण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी वाचनालयाचे संचालक नगराध्यक्षा प्राची काणेकर, चंदगड अर्बनचे अध्यक्ष दयानंद काणेकर, नगरसेविका अनुसया दाणी, नगरसेवक शिवानंद हुंबरवाडी, सचिन नेसरीकर, दिलीप चंदगडकर, नेत्रदीपा कांबळे, विवेक सबनीस, विशाल कामत, सुधीर देशपांडे, राजेंद्र परीट, श्रीकृष्ण दाणी, अभिजित गुरबे, अल्लीसो मुल्ला, प्रविण वाटंगी, पुष्पा नेसरीकर उपस्थित होत्या. आभार ग्रंथपाल समीर शेलार यांनी मानले.



No comments:

Post a Comment