लोकांनी अनुभवली चिखलातील आगळ्यावेगळी दहीहंडी व रस्सीखेच स्पर्धा, बघ्यांची गर्दी, कोठे.......... - चंदगड लाईव्ह न्युज

21 August 2022

लोकांनी अनुभवली चिखलातील आगळ्यावेगळी दहीहंडी व रस्सीखेच स्पर्धा, बघ्यांची गर्दी, कोठे..........

 
आगळीवेगळी चिखलातील दहीहंडी स्पर्धा.

बेळगाव / सी. एल. वृत्तसेवा

              रविवारी बेळगावकर जनतेने आगळ्यावेगळ्या चिखलातील स्पर्धेत सहभागी होण्याचा आणि पाहण्याचा आनंद लुटला. गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने गेल्या काही वर्षापासून चिखलात तील स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. गेली दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे या स्पर्धा झाल्या नव्हत्या. त्यामुळे यंदा स्पर्धकांचा आणि प्रेक्षकांचा सहभाग अधिक होता.स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार अभय पाटील आणि आमदार अनिल बेनके उपस्थित होते.

अनोखी चिखलातील रस्सीखेच स्पर्धा
                       विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात काळाच्या पडद्याआड जात असलेल्या पारंपरिक खेळांची माहिती नव्या पिढीला मिळावी आणि त्यांनी या खेळांचा आनंद लुटावा म्हणून चिखलातील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार अभय पाटील यांच्या तर्फे  पाटील फार्म येथे चिखलातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
                            शहरातील विविध भागातून आलेल्या स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता.विशेष म्हणजे नगरसेवकांनी देखील चिखलात पळण्याच्या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला होता. चिखलात खेळल्या गेलेल्या रस्सी खेच स्पर्धेने तर प्रेक्षकांना वेगळा आनंद मिळवून दिला. रस्सी खेच स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या संयम आणि शक्तीचा कस लागला. चिखलात तील दही हंडी फोडण्यासाठी देखील गोविंदा पथके आली होती. चिखलात थांबून थर रचून दही हंडी फोड घेणे सोपे काम नव्हते. पण जिद्द, शक्ती आणि योजनाबद्ध पद्धतीने थर रचून गोविंदा पथकाने बाजी मारली. विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली.

No comments:

Post a Comment