चंदगड पोलिसांच्या टीमने चन्नेटी (ता. चंदगड) येथे गावठी दारु तयार करणाऱ्या भट्टीवर कारवाई करुन नष्ट केले. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चन्नेटी (ता. चंदगड) गावच्या हद्दीत जंगलात रानावनात गावठी हातभट्टी दारु तयार करणाऱ्या हातभट्टीवर चंदगड पोलिसांनी आज अचानक छापा टाकला. यामध्ये गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व कच्चे रसायनसह ६५ हजार ८०० रुपये किंमतीचे साहित्य चंदगड पोलिसांनी जागीच नष्ट केले. रविवारी (ता. २१) सकाळी साडेसात वाजता हि कारवाई करण्यात आली. याबाबत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पो. कॉ. अमोल अर्जून देवकुळे यांनी याबाबतची फिर्याद चंदगड पोलिसात दिली आहे.
यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी – चंदगड तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या चन्नेटी येथे गावठी दारु तयार करुन परिसरात विक्री होत असल्याची माहीती पोलिसांनी मिळाली. मिळालेल्या माहीतीनुसार रविवारी सकाळी साडेसात वाजता चंदगड पोलिसांनी या हातभट्टीच्या ठिकाणी छापा कारवाई केली. यामध्ये त्यांना 30,400/- रु त्यात प्लॅस्टीकचे एक ड्रम 400/- किंमतीचे, त्यामध्ये 300 लिटर आंबट उग्र वासाचे रसायन भरलेले प्रति 100 रुपये प्रमाणे व सदरचे रसायन सॅम्पल नमुना घेऊन पंचाचे समक्ष नाश केलेले. 35,400/- रु त्यात प्लॅस्टीकचे एक ड्रम 400/- किंमतीचे त्यामध्ये 350 लिटर आंबट उग्र वासाचे रसायन भरलेले प्रति 100 रुपये प्रमाणे व सदरचे रसायन सॅम्पल नमुना घेऊन पंचाचे समक्ष नाश केलेले असे एकूण ६५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. घटनेची नोंद कोवाड पोलिसात झाली असून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई नाईक, पो. ना. भदरगे, पो. ना. किल्लेदार, पो. कॉ. देवकुळे, पो. कॉ. कांबळे, पो. कॉ. पाटील, पो. कॉ. सायेकर यांनी हि कारवाई केली.
No comments:
Post a Comment