गोडचिनमलकी येथील धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित - चंदगड लाईव्ह न्युज

10 August 2022

गोडचिनमलकी येथील धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित

पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालेला गोडचिनमलकी येथील धबधबा

बेळगाव / सी. एल. वृत्तसेवा

          बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील गोडचिनमलकी येथील धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे.

            जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे गोकाक येथील धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला होता.जुलै महिन्यात देखील गोडचिनमलकी धबधब्याला पाणी आले होते पण पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला नव्हता.आता मात्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. मार्कंडेय नदीवरील हा धबधबा सध्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. नदीचे पाणी पायऱ्या प्रमाणे असणाऱ्या खडकावरून  वाहत येते.सध्या पाणी वेगाने वाहत असल्याने पाणी पडताना तुषार देखील उडत आहेत. हा धबधबा पाहण्यासाठी एक किलोमीटर अंतर चालत जावे लागते.एक किलोमीटर अंतर चालत जावे लागले तरी धबधबा पाहिल्यावर एक किलोमीटर चाललेले कष्ट पर्यटक विसरून जातो.

No comments:

Post a Comment