चंदगड येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्त्या - चंदगड लाईव्ह न्युज

09 August 2022

चंदगड येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्त्या

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

                चंदगड येथील रामा तुकाराम सुझी (वय ४२, रा. कॉलेज रोड) या गंवडी काम करणाऱ्या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची वर्दी त्यांचे मेहुणे दीपक बाबू कदम यांनी सोमवारी चंदगड पोलिसात दिली. रामा सुझी हे गवंडी काम करत होते. सोमवारी घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने घराच्या बेडरूमधील स्लॅबच्या हुक्काला दोरी बांधून गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. कामावरून पत्नी घरी आली असता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत अधिक तपास पोलीस नाईक पी. एन. महापुरे करीत आहेत.

No comments:

Post a Comment