तानाजी नारळकर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
अडकूर (ता. चंदगड) येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी तानाजी दत्तू नारळकर (वय ५०, रा. पोश्रातवाडी, ता. आजरा) यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. याबाबत अधिक माहिती अशी, तानाजी नारळकर हे नेहमीप्रमाणे अडकूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत सोमवारी कामावर रूजू झाले होते. कार्यालयात ते काम करत असताना अचानक त्यांना चक्कर येऊन आली आणि ते बेशुद्ध होऊन ते खाली कोसळले. त्यांना तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. बी. डी. सोमजाळ यांनी नारळकर यांची तपासणी करून हृदयविकाराच्या धक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनेची वर्दी वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमजाळ यांनी चंदगड पोलिसात दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार जमीर मकानदार करीत आहेत.
No comments:
Post a Comment