चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश - चंदगड लाईव्ह न्युज

09 August 2022

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

संग्रहित छायाचित्र

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            शिवाजी युनिव्हर्सिटी स्टॅटिस्टिक्स टीचर्स असोसिएशन (सुस्टा) या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या लेखी प्रश्नमंजुषा स्पर्धेत येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या नरेंद्र कडुकर, महेश मोरे व ऋतुजा फाटक या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

           विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत त्यांचे नाव झळकले असून त्यांच्या या यशाचा महाविद्यालयाला सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी दिली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रा एल. एन. गायकवाड व प्रा.  पी. ए. निट्टूरकर यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पुन्हा एकदा महाविद्यालय व विद्याथ्यांची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे. या यशाबद्दल विद्यार्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment