महिपाळगड येथे अमृत महोत्सवी स्वातत्रदिन उत्साहात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2022

महिपाळगड येथे अमृत महोत्सवी स्वातत्रदिन उत्साहात संपन्न

महिपाळगड येथे अमृत महोत्सवी स्वातत्रदिन उत्साहात संपन्न झाला.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          महिपाळगड (ता. चंदगड) येथे अमृत महोत्सवी स्वातत्रदिन उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी सकाळी ग्रामपंचायत येथील ध्वजारोहण सरपंच प्रा. रमेश भोसले यांच्या हस्ते, कुमार विद्यामंदिर येथील ध्वजारोहण  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश अमृत बोंगाळे यांच्या हस्ते झाले. 

      महादेव बूरूंज(किल्ला) येथे शासकीय ध्वजारोहण मंडल अधिकारी आप्पासाहेब जिरनाळे यांच्या हस्ते, शिवराज विद्यालय येथील ध्वजारोहण मुख्याध्यापक सुनील रामचंद्र सावंत यांच्या हस्ते, शहिद जवान महादेव पाडुरंग तुपारे स्मारक येथील ध्वजारोहण माजी सैनिक सुरेश धोंडिबा कदम यांच्या हस्ते तर अंगणवाडी येथील ध्वजारोहण सौ. शितल चांगदेव कदम, सौ. मनिषा रवळनाथ केसरकर, सौ. वंदना गणपती भोसले, लिला ओमाणी बोंगाळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश बोकडे, तलाठी शिवाजी विरुपाक्ष गौडा, ग्रामसेवक सुभाष वारे, वैजनाथ कदम, तुकाराम तुपारे यासह सदस्य, विविध संस्थाचे पदाधिकारी  शिक्षक विध्यार्थी, शिवकन्या ग्रामसंघाच्या सर्व महिला, युवक मंडळ, पदाधिकारी, पोलीस पाटील, अंगणवाडी शिक्षिका, मदतनिस, ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment