चंदगड आगार प्रमुखांच्या मनमानीमुळे विद्यार्थ्यांचे ध्वजवंदन चुकले - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2022

चंदगड आगार प्रमुखांच्या मनमानीमुळे विद्यार्थ्यांचे ध्वजवंदन चुकले

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड एसटी आगाराचे आगारप्रमुख यांच्या मनमानी कारभारामुळे अनेक एसटीच्या फेऱ्या अचानक रद्द केल्याने अनेक विद्यार्थ्याना सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी ध्वजवंदन कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही.

       भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वत्र ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला. पण चंदगड एस. टी. आगारामुळे मात्र अनेक विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वेळेत उपस्थित राहता आले नाही. याचे कारण म्हणजे एस. टी. आगाराने अचानक सकाळच्या अनेक मार्गावरील फेऱ्या सुट्टी असल्या कारणाने रद्व केल्या. असे वारंवार घडत आहे. अचानक अशा फेऱ्या रद्ध केल्या जातात. याची कल्पना प्रवाशांना नसते. प्रवाशी मात्र तासनतास बस येणार म्हणून वाट बघत बसतात. 

           शेवटी वडापचा आधार घेऊन प्रवास करायची वेळ येते. चंदगड एसटी आता भरवशाची राहीली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होत आहे. भविष्यात आगाराच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. वरिष्ठांनी याचा सविस्तर आढावा घ्यावा. यावर तात्काळ चंदगड आगारातील आगार व्यवस्थापकांना याबाबत सूचना करून एसटी पूर्वीप्रमाणे सुरळीत करावी अशी मागणी होत आहे. 

No comments:

Post a Comment