आजी-माजी सैनिक संघटनेकडून म्हाळेवाडी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2022

आजी-माजी सैनिक संघटनेकडून म्हाळेवाडी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

म्हाळेवाडी येथे आजी माजी सैनिक संघटनेकडून विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वितरण करताना मान्यवर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

            आजी माजी सैनिक संघटना म्हाळेवाडी (ता. चंदगड) यांच्या कडून स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सर्व शालेय विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.   हायस्कूल व मराठी शाळेमधील विद्यार्थ्याना यामध्ये दहावी, बारावीच्या बोर्ड परिक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, कथाकथन, नवोदय निवड झालेल्या तसेच शालेय भाषण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, ड्रॉईंग स्पर्धा अशा सर्व विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर इतरही सर्व  विद्यार्थ्याना कंपास पेटी, ड्रॉईंग वही, रबर, पेन्शील, शॉपणर अशा वस्तूंचे  वितरण सरपंच सी. ए. पाटील, तंटामुक्त अध्यक्ष वसंत पाटील, मोमाना कोकितकर, मारूती पाटील, विश्वनाथ पाटील, मुख्याध्यापक  एन. आर. भाटे, नरसू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment