तडशिनहाळ येथील विविध संस्थाकडून मराठी शाळेला स्टडी ग्रीन बोर्ड प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

11 September 2022

तडशिनहाळ येथील विविध संस्थाकडून मराठी शाळेला स्टडी ग्रीन बोर्ड प्रदान

 

मराठी शाळेला स्टडी ग्रीन बोर्ड प्रदान प्रसंगी मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          तडशिनहाळ (ता. चंदगड) येथील बलभीम दूध संस्था, महालक्ष्मी दूध संस्था व रामलिंग सेवा सोसायटी या संस्थाकडून प्राथमिक शाळेला ३०,००० रू किंमतीचा स्टडी ग्रीन बोर्ड देण्यात आला.प्रारंभी मुख्याध्यापक तानाजी नाईक यानी प्रास्ताविक करून उपस्थितीतांचे स्वागत केले.यावेळी मुलांनी या स्टडी ग्रीन बोर्ड बेंच चा वापर कसा केला जाईल व अक्षर कसे सुधारेल याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी माजी सरपंच नारायण पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

             यावेळी शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष रवी कोणेवाडकर, उपाध्यक्ष दत्तात्रय कदम, सदस्य पुंडलिक बोलके, राजू बोलके, मनीषा कडोलकर, बलभीम दूध संंस्थाध्यक्ष तुकाराम दळवी, सचिव शिवराम कोनेवाडकर, महालक्ष्मी दूध संंस्थाध्यक्ष फर्नांडिस, सचिव यशवंत करडे, रामलिंग सेवा संस्थाध्यक्ष आप्पाजी करडे, उपाध्यक्ष पुंडलिक कदम, सरपंच सुजाता कदम, उपसरपंच रामलिंग गुरव, वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष कृष्णा दरेकर, डी. जे पाटील, कीर्ती पाटील यासह संंस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार विद्या कदम यांनी मानले.



No comments:

Post a Comment