अनिल कांबळे यांना शिक्षणमंत्री केसरकर यांच्या हस्ते गुरुसेवा पुरस्कार प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

11 September 2022

अनिल कांबळे यांना शिक्षणमंत्री केसरकर यांच्या हस्ते गुरुसेवा पुरस्कार प्रदान

शिक्षणमंत्री केसरकर यांच्या हस्ते गुरुसेवा पुरस्कार स्विकारताना शिक्षक अनिक कांबळे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

             माणगाव (ता. चंदगड) येथील रहिवासी व सध्या नेमाळे (ता.सावंतवाडी जि.सिधुदुर्ग) विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक अनिल लक्ष्मण कांबळे यांना शालेय शिक्षण मंत्री दिपकभाई यांच्या हस्ते गुरुसेवा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सावंतवाडी येथे काल या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अनिल कांबळे यानी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.

        यावेळी व्यासपीठावरती महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष वि.ना. लांडगे (सातारा), सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, मराठी त्रैमासिकाचे संपादक भरत गावडे, माजी शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, कोकण मराठी साहित्य परिषद कार्यवाह विठ्ठल कदम उपस्थित होते. कार्यालयाला मातोश्री सौ.शांता लक्षमण कांबळे, सौ.अलका अनिल कांबळे, पोलिस पाटील मारुती कांबळे, दीपक कृष्णा कांबळे, अनुजा कांबळे, अभिनव कांबळे उपस्थित होते. "गुरु सेवा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ.भि.राऊळ, प्राचार्या कल्पना बोवलेकर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर माणगाव येथील टिळक चौक सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, अनिल शिवनगेकर, सटुप्पा फडके यांनी सत्कार केला. माणकेश्वर सार्वजनिक गणेश मंडळ व माणकेश्वर सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष अनिल सुरुतकर सुधीर लांडे, अशोक बेनके यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक शि. ल. होनगेकर यांच्या हस्ते अनिल कांबळे यांचा सत्कार केला. तसेच  ग्रामपंचयतीच्या वतीने सरपंच सौ. आश्विनी कांबळे यांनीही सत्कार केला.

No comments:

Post a Comment