वाणिज्य शाखेत नोकरीच्या अनेक संधी - धनुक्षे, हलकर्णी महाविद्यालयात आयात निर्यात व्यवस्थापन कोर्स विषयी मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

14 September 2022

वाणिज्य शाखेत नोकरीच्या अनेक संधी - धनुक्षे, हलकर्णी महाविद्यालयात आयात निर्यात व्यवस्थापन कोर्स विषयी मार्गदर्शन

बोलताना प्रकाश धनुक्षे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          शिक्षणाचा वापर जीवन घडविण्यासाठी करा पदवीनंतर अनेक संधी वाणिज्य क्षेत्रात उपलब्ध आहेत. आयात निर्यात, व्यवस्थापन क्षेत्र हे नोकरीच्या संधी उपलब्ध करते. नोकरीच्या संधी उपलब्ध करते. पदवीच्या शिक्षणाबरोबरच इतर क्षेत्रात कौशल्य विकसित करा आठ क्षेत्रात संधी आहेत असे प्रतिपादन समन्वयक (जीपीआर कार्पोरेशन एक्झिम मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मुंबई )प्रकाश धनुक्षे यांनी केले. 

         ते हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वाणिज्य विभाग मार्फत आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य पी. ए. पाटील होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. सुनील सिंग, डॉ. राजेश घोरपडे, प्रा. वी. डी. पाटील, डॉ. चंद्रकांत पोतदार  उपस्थित होते.

           प्रारंभी प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. जी. जे. गावडे यांनी तर प्रा. जी. पी. कांबळे यांनी स्वागत केले. यावेळी प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यानी वाणिज्य शाखेत आयुष्य घडवता येते शिक्षणाबरोबरच इतर कौशल्य आपणास विकसित करा. तर वाणिज्य शाखेला सध्याच्या युगात मोठे महत्त्व असल्याचे सांगितले. तर अध्यक्ष मनोगतात प्रा. पी. ए. पाटील यानी संभाषण कौशल्य स्वतःमध्ये विकसित करा. कारण उद्योग क्षेत्रात संभाषणास अन्यसाधारण महत्त्व आहे वाचन, लेखन, कौशल्य आपणास संधी उपलब्ध करून देतात. चौफेर ज्ञान अवगत करा, आवडीनिवडीनुसार करिअर करा असे सांगितले. यावेळी डॉ. राजेश घोरपडे यांनीही मनोगत व्यक्त केले. अभिजीत चव्हाण, सुजित पाटील यासह विद्यार्थ्यी, प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. एम. एन. पाटील यांनी केले तर आभार डॉ. जयश्री पाटील यांनी मांनले.

No comments:

Post a Comment