शाळांमधून सुजाण नागरिक घडतो - कदम, कोवाड येथील श्रीराम विद्यालयात' शालेय अनुभव कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

14 September 2022

शाळांमधून सुजाण नागरिक घडतो - कदम, कोवाड येथील श्रीराम विद्यालयात' शालेय अनुभव कार्यक्रम

कोवाड येथील श्रीराम विद्यालयात' शालेय अनुभव  कार्यक्रम

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

              शाळा ही समाज घडविण्याचे साधन आहे. शिक्षकांमुळेच सुजाण नागरिक घडतो. त्यामुळे सध्याच्या काळात शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यां मध्ये शिक्षणाबद्दल कशी गोडी निर्माण करता येईल यावर भर दिला पाहिजे असे प्रतिपादन एस. टी. कदम यांनी सर्व बी. एड. प्रशिक्षणार्थीना केले. ते कोवाड (ता. चंदगड) येथील श्रीराम विद्यालयात महादेवराव वांद्रे बी. एड् काॅलेज तुर्केवाडी अंतर्गत, 'शालेय अनुभव कार्यक्रम 'उद्घाटन समारंभात बोलत होते. 

               प्रारंभी प्रास्ताविक रणजित मोहिते यानी केले. यावेळी किणी कर्यात संस्थेचे अध्यक्ष अशोक देसाई, मुख्याध्यापक  एस. एन. पाटील , डी. आर. धर्माधिकारी, पी. आय. पाटील, छात्रमुख्याध्यापक युवराज वाघमोडे व डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम गट क्र. ३ चे सर्व छात्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन वैशाली लोहार यांनी केले तर आभार पूजा लाड यांनी मानले. 

No comments:

Post a Comment