चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
हलकर्णी (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांने गणेश विसर्जन मिरवणूकीतील अनावश्यक खर्चाला फाटा देत शिल्लक रक्कमेतून केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांना ४०० वह्या व पेन भेट दिली. मंडळाचे पालकत्व घेतलेले सरपंच राहुल गावडे यांच्या संकल्पनेतून समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेतले जातात.
मंडळामार्फत प्रदुषण नियंत्रणासाठी गणेश मुर्ती दान करणे,महिलांसाठी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, मुलांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा घेण्याबरोबरच भावगीता व सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर विसर्जन मिरवणूकितील गुलाल, फटाकड्या, बेंजो आदी अवास्तव खर्चाला फाटा देत शिल्लक रक्कमेतुन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, माजी सरपंच एकनाथ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. मंडळांचे अध्यक्ष तुषार नेसरकर, उपाध्यक्ष अनिल नाईक, सदस्य प्रशांत गावडे, विनायक केसरकर, विनोद गुरव, पांडुरंग केसरकर, जोतिबा सावंत, मच्छिंद्र पाटिल, रामु नाईक, रमेश नाईक, सौ. बामणे व विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक अशोक बेनके स्वागत केले. प्रास्ताविक सुभाष चांदिलकर यानी केले तर आभार ए. एम. चाळुचे यांनी मानले.
No comments:
Post a Comment