अध्ययनशील असणं हे शिक्षकाच व्रत - डॉ. पांडव, हलकर्णी महाविद्यालयात आयोजित शिक्षक दिनाप्रसंगी 'भवितव्य घडवताना' कार्यक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

15 September 2022

अध्ययनशील असणं हे शिक्षकाच व्रत - डॉ. पांडव, हलकर्णी महाविद्यालयात आयोजित शिक्षक दिनाप्रसंगी 'भवितव्य घडवताना' कार्यक्रम संपन्न

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            डिजिटल शिक्षक बनन ही काळाची गरज आहे. ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या तर  शिक्षक अधिक संपन्न होत असतो. विद्यार्थी जीवनात शिक्षक हाच खरा गुरू असतो.' असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. प्रमोद पांडव यांनी केले. ते हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यायातर्फे आयोजित शिक्षक दिनाप्रसंगी 'भवितव्य घडवताना' या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी गोपाळराव पाटील होते.

            प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात करण्यात आले. सर्वांचे स्वागत प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी केले. प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी करून दिला. गोपाळराव पाटील म्हणाले.' ``विद्यार्थी जीवन हे अनेक विषयांना घेऊन समृध्द होण आहे. काळाबरोबर धावताना स्वतःचे अस्तित्व निर्माण करा. एका अर्थाने यशस्वी जीवन घडवा,असे सांगितले.``

        यावेळी शिक्षक दिनाच्या प्राचार्या कु. माधुरी सुतार, कु. इंद्रायणी पाटील, सानिका कलोलकर यांनी मनोगत मांडले. यावेळी व्यासपीठावर अशोक जाधव, संजय पाटील, विशाल पाटील, डॉ. राजेश घोरपडे, डॉ. जे. जे. व्हटकर, प्रा. पिटूक, प्रा. कलजी, प्रा. जाधव, प्रा. व्ही. डी. पाटील, प्रा. सुवर्ण पाटील, प्रा.सुरेश कांबळे, प्रा. गीताजली गावडे, यांचेसह वरिष्ठ व कनिष्ठ विभागाचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. वंदना केळकर यांनी तर आभार प्रा. कुचेकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment