हिंदी दिनानिमित्य मार्गदर्शन करताना आय. वाय.गावडे |
अडकूर / सी. एल. वृत्तसेवा
श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) येथे राष्ट्रीय हिंदी दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी होते.
हिंदी दिनाचा संपूर्ण समारंभ इयत्ता आठविच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी हिंदी विषय शिक्षक व्ही. एन. सुर्यवंशी, प्रा. रामदास बिर्जे, आय. वाय. गावडे व अभिषेक तेली या शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . यावेळी प्रा . रामदास बिर्जे यानी हिंदीचा गौरव करणारे हिंदी गीत गायन केले .
तर आय .वाय. गावडे यानी राजभाषा हिंदीचे राष्ट्रभाषा म्हणून महत्त्व सांगून हिंदी भाषेचा आदर मिळवण्यासाठी तिचा प्रचार व प्रसार करण्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. त्याबरोबरच हिंदी दिनाचा इतिहास, परिचय व महत्त्व मांडले. देशाच्या कानाकोपऱ्यात हिंदीचा आदर वाढावा, यासाठी हिंदी दिवस सोहळ्यात शासकीय किंवा शासकीय कार्यालयांमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांची माहिती देण्यात आली.
इयत्ता ५ वी ते १० वीपर्यंतच्या समिक्षा घोरपडे, संस्कृती कांबळे, आरूषी भादवणकर, संग्राम गुडळकर, अनविता संकपाळ, नयन ताम्हणगोंडे, किर्ती सावंत -भोसले, वैष्णवी कदम, किर्ती पवार या विद्यार्थ्यानी हिंदी भाषेवर मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाला एस.एन पाटील, जे. व्ही. कांबळे, ए. के. निर्मळकर आदि शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. रामदास बिर्जे यांनी केले. सूत्रसंचालन हसरी देसाई व तेजस्विनी गावडे यांनी तर आभार पी. के. पाटील यानी मानले.
No comments:
Post a Comment