चंदगड: सी. एल. वृत्तसेवा
भविष्यकालीन संकटाचा सामना करून जीवन सुकर बनविण्यासाठी कुटुंबाचे प्रभावी आर्थिक व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. बदलत्या अनिश्चित परिस्थितीत टिकून राहून प्रगती करण्यासाठी भविष्याचा वेध घेत आर्थिक नियोजन करावे लागते. परिणामी त्या नियोजनातून आपली निर्धारित कामे पूर्ण होतात. असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडिया कोल्हापूर शाखेचे निवृत्त अधिकारी गुरु भाटे यांनी केले.
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित "आर्थिक साक्षरतेतून कुटुंबाची वित्तीय नियोजन" या विषयावरील कार्यशाळेत बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. पाटील होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस. डी गोरल यांनी प्रास्ताविक करून कार्यशाळेचा उद्देश विशद केला. श्री. भाटे पुढे म्हणाले, ``कुटुंबाच्या प्रभावी आर्थिक व्यवस्थापनासाठी आपली बचत व गुंतवणूक कधी व कुठे करावी? याबाबत चिकित्सक अभ्यास महत्त्वाचा आहे. गुंतवणुकीतील जोखमीनुसार गुंतवणुकीची तरलता, परतावा व सुरक्षितता निश्चित होते. म्हणून आर्थिक नियोजन अत्यावश्यक आहे.``
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील म्हणाले, ``विविध मार्गाने पैसा मिळवणे सोपे असते परंतु त्याचा किफायतशीरपणे खर्च करणे अवघड असते. म्हणून "नियोजन अथवा विनाश" या तत्त्वाचा सर्वांनी विचार करावा. सदर कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात स्टेट बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर शाखेचे व्यवस्थापक श्री. पाटील यांनी बचत व गुंतवणूकीच्या विविध योजनांची माहिती दिली.
या कार्यशाळेत डॉ. पी. एल. भादवणकर. प्रा. एल. एन. गायकवाड, प्रा. आर. एस. पाटील. प्रा. टि. एम. पाटील. डॉ. टि. ए. कांबळे यांच्यासह बहुसंख्य प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थिती होती. कार्यशाळेच्या शेवटच्या प्रश्नोत्तर सत्रात अनेकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. एन. पाटील यांनी केले. तर आभार डॉ. एस. डी गावडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment