चंदगड येथे लियाफी संघटनेच्या वतीने LIC वीमा प्रतिनिधींच्या विविध मागण्यासाठी एक दिवशीय काम बंद आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

30 September 2022

चंदगड येथे लियाफी संघटनेच्या वतीने LIC वीमा प्रतिनिधींच्या विविध मागण्यासाठी एक दिवशीय काम बंद आंदोलन

चंदगड येथे वीमा प्रतिनिधींनी एक दिवशीय काम बंद आंदोलन करुन विविध मागण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करताना चंदगड तालुक्यातील वीमा प्रतिनिधी. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड येथील एल. आय. सी. सॅटेलाईट कार्यालयासमोर आज दिवसभर लियाफी संघटनेच्या वतीने एलआयसी वीमा प्रतिनिधींनी विश्राम दिवस पाळत काळ्या फिती लावून विविध मागण्यांसाठी एक दिवशीय काम बंद आंदोलन केले. 

       जिंदाबाद जिंदाबाद लियाफी जिंदाबाद, आवाज दो हम सब एक है, पॉलिसी धारकांच्या नुकसान करणाऱ्या अटी रद्द झाल्याच पाहिजेच अशा घोषणा देण्यात आल्या. 

          पॉलिसी वरील बोनस रेट वाढला पाहिजे, पॉलिसी वरील कर्जाचे व्याजदर कमी करा, एलआयसी प्रतिनिधीना मेडिक्लेम वाढवून द्यावा, एलआयसी प्रतिनिधींना ग्रॅज्युटी द्यावी, प्रिमीयमरील जीएसटी रद्द करावा, प्रिमीयम भरताना विलंब झाल्यास विलंब शुल्क व त्यावरील जीएसटी रद्द करावी, पॉलिसीधारकाला मिळणारा बोनस वाढवून द्यावा. या प्रमुख मागण्यासाठी आज शुक्रवारी दिवसभर एलआयसी प्रतिनिधींनी जोरदार घोषणाबाजी करत प्रतिनिधींच्या विविध मागण्यासाठी एक दिवशीय काम बंद आंदोलन केले.  

           यावेळी लियाफी संघटनेचे तालुकाध्यक्ष विष्णू कंग्राळकर व उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दयानंद पाटील, राजेंद्र पाटील, गजानन राऊत, राहुल पाटील, चंद्रकांत शिंदे, पुंडलिक पाटील, सुरेश दळवी, बाबु गावडे, परशुराम गावडे, शिवाजी आपके, दिलीप कांबळे, बाबाजी पाटील अशोक दळवी यासह चंदगड तालुक्यातील विमा प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment