तेज बांधकाम कामगार संघटना "नेसरी" च्या वतीने बांधकाम कामगारांना सुरक्षा कवच वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

30 September 2022

तेज बांधकाम कामगार संघटना "नेसरी" च्या वतीने बांधकाम कामगारांना सुरक्षा कवच वाटप

कार्यक्रमात बोलताना पंचायत समिती माजी उपसभापती विद्याधर गुरबे

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

      तेज बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समिती माजी उपसभापती गडहिंग्लज तालुका विद्याधर गुरबे यांच्या पुढाकाराने ४१५ बांधकाम कामगार लाभार्थ्यांना शुक्रवारी (ता. ३०) सुरक्षा कवच वाटप करण्यात आले. 

        या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुणे मा. विद्याधरजी गुरबे साहेब, एच. पी. गॅस एजन्सी मुख्य सौ. गिरिजादेवी संग्रामसिंह शिंदे-नेसरीकर, नेसरीचे मा. सरपंच प्रकाश दळवी, ग्रा. प. स. रामचंद्र परीट, नेसरी ग्रा. पं. सदस्या पद्मजा देसाई,  ग्रा. पं. सदस्या मनिषा मुरूकटे, आर. पी. आय. चे दिलीप कांबळे, रामदास पाटील, काका मुजावर, पिंटू गुंजाटी, गुरुनाथ चव्हाण, अक्षय माटले, स्वप्निल देसाई, सुरज कांबळे, संदिप पाटील, सागर नांदवडेकर, राहुल कांबळे, विनायक नाईक, संजय दळवी, भागातील प्रमुख कार्यकर्ते व बांधकाम कामगार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment