रांगी वसाहतीच्या विकासासाठी शासन दरबारी प्रयत्न सूरू आहेत - सरपंच सौ. अश्विनी कांबळे - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2022

रांगी वसाहतीच्या विकासासाठी शासन दरबारी प्रयत्न सूरू आहेत - सरपंच सौ. अश्विनी कांबळे

तेऊरवाडी /  सी. एल. वृत्तसेवा

             विकास कामात माणगाव (ता. चंदगड) ही ग्रामपंचायत नेहमीच अग्रेसर असून  गेल्या तीन वर्षात विविध माध्यमातून जवळपास दोन कोटींची विकासकामे झाली आहे. रागीट वसाहतीच्या विकासासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत. केवळ डिजीटल फलक लावून स्टंटबाजी करण्यापेक्षा सर्वांनी सहकार्य केल्यास माणगावाचा सर्वागीण विकास जोमाने होऊ शकतो अशी प्रतिक्रिया माणगावच्या सरपंचा सौ. अश्वीनी कांबळे यांनी दिली.

          रागी वसाहतीतील नागरिकांनी या वसाहती मध्ये विकास होत नसल्याने गाव झकास. मात्र रांगी वसाहत भकास या मथळ्या खाली एक डिजीटल फलक लावून नागरिकांसह सर्वांचेच लक्ष वेधले होते,यावर सर्वप्रथम चंदगड लाई्व्ह न्यूजने बातमी प्रसिद्ध केली होती. रांगी वसाहतीतील काही ग्रामस्थानी रस्ता, विज प्रश्नासंदर्भात तक्रार केली होती. यावर सरपांचा सौ. कांबळे यानी प्रतिक्रिया दिली.

            सर्वांचा १०० टक्के विकास करताना काही अडचणीही येतात. एखादे काम शासनाकडून निधी मिळत नसल्याने अपूर्ण राहणारच. कोरोणा काळातही गावामध्ये विविध माध्यमातून कोटींची कामे झाली आहेत. रांगी वसाहत गावाच्या बाहेर जवळपास १ कि. मी. अंतरापर्यंत पसरली आहे. शेताकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याच्या दोन्ही बाजूना जवळपास १२ घरे बांधण्यात आली आहेत. हा पाणंद रस्ता ३३ फूटानी तुटला असतानाही काही संबधीतानीच या रस्त्यावर अतिक्रमणे केली आहेत . हा शेतात जाणारा रस्ता आहे. या अगोदर आमदार खासदार यांना रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी निवेदने देवून  निधी मागणी केली आहे. यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न चालू आहेत. 

            या अगोदर हा रस्ता बाबासाहेब कुपेकर यांच्या फंडातून खडीकरण  झालेला असूम ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा केला आहे. विज पुरवठयासाठी विद्युत विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे  ग्रामपंचायत फंडातून या रस्त्यासाठी निधी लावणे अशक्य आहे. केवळ आपल्या सोयीसाठी गावापासून  दूरवर घरे बांधकाम करायचे आणि विविध सुविधेसाठी पोस्टरबाजी करणे योग्य नाही. असा खोडसाळपणा करणे म्हणजे गावची प्रतारणा करणे आहे. सर्वाच्या सहकार्याने गावचा विकास होणार आहे .विनाकरण ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. आपणाला आपल्या समस्या मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. ग्रामपंचायत समस्या सोडवण्यासाठीच आहे. पण अशी पोष्टरबाजी करून समस्या सुटत नसतात याचेही भान ठेवण्याचे आवाहन सरपंचा सौ. कांबळे यांनी केले.

No comments:

Post a Comment