कुदनुर केंद्रांतर्गत राजगोळी खुर्द येथे शिक्षण परिषद संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

26 September 2022

कुदनुर केंद्रांतर्गत राजगोळी खुर्द येथे शिक्षण परिषद संपन्न

कुदनुर केंद्रांतर्गत राजगोळी खुर्द येथे शिक्षण परिषद संपन्न


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

            कुदनूर  केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पुष्प तिसरे विद्या मंदिर राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथे नुकतेच  पार पडले. राजगोळी येथील प्रतिष्ठित नागरिक राघवेंद्र इनामदार अध्यक्षस्थानी होते.

   प्रास्ताविक अशोक नौकुडकर यांनी केले. स्वागत शाळेचे मुख्याध्यापक शामकांत देसाई यांनी केले. तज्ञ मार्गदर्शक विनायक गावडा, प्रल्हाद गावडे, देवानंद पाटील यांनी निपुण भारत, ऑनलाईन PMFS प्रणाली, माता गट याविषयी मार्गदर्शन केले. केंद्र समन्वयक रामचंद्र मोटूरे यांनी प्रशासकीय मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेस केंद्रातील इयत्ता पहिली ते आठवी चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार भैरू भोगण यांनी मानले.

No comments:

Post a Comment