उपक्रमशिल शिक्षक प्रशांत पाटील यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिक्षक समितीकडून सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2022

उपक्रमशिल शिक्षक प्रशांत पाटील यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिक्षक समितीकडून सत्कार

शिनोळी खुर्द : प्रशांत पाटील व सुधा पाटील या दांपत्याचा सत्कार करताना मान्यवर.

कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

        शिनोळी खुर्द (ता. चंदगड) येथील रहिवासी व सरोळी (ता. चंदगड) विद्यामंदिरचे उपक्रमशिल शिक्षक प्रशांत मारुती पाटील यांना जिल्हा परिषदेचा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्राथमिक शिक्षक समितीकडून त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

        प्रशांत पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल यावर्षीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी त्यांना महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, केदारी रेडेकर गुणवंत शिक्षक पुरस्कार व अन्य विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार तसेच संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जि. प. सदस्या सुजाता पाटील, विद्या पाटील, तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी गौरवपर भाषण केले. या कार्यक्रमाला सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील आणि मान्यवर यांच्यासह सांगाती पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन प्रा. बाबुराव नेसरकर, एम. जे. पाटील, बसवंत अडकुरकर, विलास पाटील, दत्ता पाटील, भैरू खांडेकर, एम. एन. पाटील तसेच अन्य शाळांचे मुख्याध्यापक शिक्षण ग्रामस्थ मित्र मंडळ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment