शुभम दिपक पाटील |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
मलतवाडी (ता. चंदगड) येथील प्रा. नामदेवराव दुंडगेकर हायस्कूलमधील शुभम दिपक पाटील या विद्यार्थ्यांने एनएमएमएस सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. त्याला ३८४०० रुपये शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोकराव देसाई, सचिव विरसिंग भोसले यांनी अभिनंदन केले. मुख्याध्यापक सुनिल हल्याळी व शिक्षकांचे त्याला मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment