शिवसेनेची चंदगड तालुक्याची नवी कार्यकारिणी जाहीर, वाचा कोणाला मिळाली पदावर काम करण्याची संधी........... - चंदगड लाईव्ह न्युज

16 September 2022

शिवसेनेची चंदगड तालुक्याची नवी कार्यकारिणी जाहीर, वाचा कोणाला मिळाली पदावर काम करण्याची संधी...........

दिवाकर पाटील यांना उपजिल्हाप्रमुख पदी निवडीचे पत्र देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत तालुकाप्रमुख नेवगिरे यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

           शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे नवे उपजिल्हाप्रमुख म्हणून दिवाकर तुकाराम पाटील (ढोलगरवाडी, ता चंदगड) तर चंदगड तालुका प्रमुखपदी कल्लाप्पा मारुती निवगिरे (तडशिनहाळ) यांची निवड करण्यात आली आहे.

         हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार समाजा पर्यंत पोचविण्यासाठी चंदगड व गडहिंग्लज विधानसभा क्षेत्रातील नव्या कार्यकारणी निवडीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नुकतीच मुंबई येथे करण्यात आली. उपजिल्हाप्रमुख  (चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुका) दिवाकर पाटील व तालुकाप्रमुख कल्लाप्पा निवगिरे यांची निवड झाली. त्याचबरोबर नव्या कार्यकारणीत  चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी नितीन नारायण पाटील (शिनोळी बुद्रुक), गडहिंग्लज तालुका प्रमुखपदी संजय म्हात्रु पाटील (सांबरे, ता. गडहिंग्लज) यांचीही नियुक्ती यावेळी करण्यात आली. निवडीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी शिवसेना राज्य सचिव संजय मोरे, कामगार सेना अध्यक्ष किरण पाऊसकर आदी मान्यवरांसह तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते तुलशीदास जोशी, ताजूदिन मंगसुळी, मिथुन पाटील, रघुनाथ पाटील आदींची उपस्थिती होती. या कामी उमेश पाटील यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment