चंदगड एस टी डेपोवर भरवसा हाय काय? नाय नाय - प्रवाशांची प्रतिक्रिया - चंदगड लाईव्ह न्युज

05 October 2022

चंदगड एस टी डेपोवर भरवसा हाय काय? नाय नाय - प्रवाशांची प्रतिक्रिया



तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड एस. टी. डेपोच्या चुकिच्या नियोजनाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. वारंवार रद्द् होणाऱ्या एस. टी. बस फेऱ्यामुळे प्रवाशांचा चंदगड एस.टी वरील भरोसा नाहिसा झाल्याने प्रवाशांना चंदगड एस. टी. वर भरोसा नाय, नाय अस गाणे म्हणण्याची वेळ आली आहे.
  चांदगड एस. टी. डेपोचे आगार व्यवस्थापकाकडून कोणतीही पूर्वकल्पना न देता वारंवार एस. टी. बस फेऱ्या रद्द केल्या जात असल्याची तक्रार प्रवाशांची आहे. काल आजऱ्याहून सायंकाळी ७ वाजता निघणारी आजरा बेळगाव गाडी रद्द करण्यात आल्याने बेळगावला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. कित्येक अशा एस. टी. फेऱ्या वारंवार रद्द होत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा एस. टी. वरचा भरवसा संपत चालला आहे. याचा परिणाम शेवटी खाजगी वाहतूकीला प्रवाशी पसंती देत आहेत. याचा प्रशासनाने गांभिर्याने विचार करावा. एस.टी. चे कर्मचारी व आगार व्यवस्थापक यांच्या मध्ये गेल्या अनेक दिवसापासून धूमसत असणाऱ्या वादाचा परिणाम ही एस.टीच्या उत्पन्नावर होत आहे. हा वादही थांबणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच चंदगडच्या प्रवाशांचा एस.टी. वरचा कमी होत असलेला भरोसा वाढेल आणि एस. टी. चे उत्पनही वाढेल.



No comments:

Post a Comment