कुडीत्रे येथील श्री राम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये एच. एस.सी आवेदन पत्र पूजन - चंदगड लाईव्ह न्युज

06 October 2022

कुडीत्रे येथील श्री राम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये एच. एस.सी आवेदन पत्र पूजन

 

कुडित्रे : आवेदन पत्र पूजन कार्यक्रमात उपस्थित मान्यवर.

चंदगड / कागणी : सी. एल. वृत्तसेवा

      मंगळवार ४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजता कुडित्रे (कोल्हापूर) येथील ज्युनियर कॉलेजमध्ये  आवेदन पत्र पूजन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य ए. डी. कुलकर्णी तसेच उपप्राचार्य सी. एन. वाळके ,ज्येष्ठ प्रा. आर. डी. मोरे, शिस्त कमिटी प्रमुख प्रा. ए. डी. पाटील, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. एन. व्ही. पोतदार, वरिष्ठ लिपिक एस. पी. पाटील,  एनसएस विभाग प्रमुख प्रा. एस. जे जाधव, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पी. एच. संकपाळ, सायन्स प्रमुख प्रा. आर. जी. इंगवले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून,आवेदन पत्राचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक उपप्राचार्य सी. एन. वाळके यांनी केले. यावेळी आपल्या मनोगतातून प्रा. एन. व्ही. पोतदार यांनी एच.एस.सी. विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक,स्वरूप व आवेदन पत्र भरत असताना कोणती काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले.

     ए. डी. कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांनी गुणदाना बरोबरच आत्मनिर्भर राहून सुसंस्कृत होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केले व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रा. आर. बी. चव्हाण यांनी तर आभार प्रा. बी. आर. पाटील यांनी मानले. यावेळी विद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, अकरावी व बारावी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment