पोलीस हवालदारांकडून वाचनालयास पुस्तके - चंदगड लाईव्ह न्युज

08 October 2022

पोलीस हवालदारांकडून वाचनालयास पुस्तके

 निवृत्त पोलीस हवालदार कल्लाप्पा पाटील यांनी पुस्तके अध्यक्ष के जे पाटील यांचेकडे सपोर्ट केली यावेळी उपस्थित प्रा. व्ही आर पाटील, वाचनालय पदाधिकारी व मान्यवर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयास 'मुंबई पोलीस' मधील सेवानिवृत्त हवालदार कल्लापा शंकर पाटील (देमानगावडे) यांनी वामनराव पै यांची पुस्तके भेट दिली. ग्रामीण भागातील वाचनालये व वाचन चळवळ समृद्ध करण्यासाठी कल्लाप्पा पाटील यांच्या सारख्या देणगीदारांचे मोठे योगदान असल्याचे मत कोवाड महाविद्यालयाचे प्रा. डॉ. व्ही. आर. पाटील यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते देणगीदार पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कल्लाप्पा पाटील यांचे मित्र अर्जुन रवळू पाटील यांचेसह लक्ष्मण पाटील, नारायण पाटील वाचनालय पदाधिकारी  विलास शेटजी, प्रा. शिवाजी खवणेवाडकर, विनायक जी पाटील, परशराम कडोलकर आदींची उपस्थिती होती. यावेळी वाचनालयास सहकार्याबद्दल शिवसेना कार्यकर्ते तुळशीदास जोशी यांचाही सन्मान करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष के. जे. पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment