वंचित बहुजनच्या तालुका कार्यकारिणीसाठी रविवारी हलकर्णी फाट्यावर मुलाखती - चंदगड लाईव्ह न्युज

08 October 2022

वंचित बहुजनच्या तालुका कार्यकारिणीसाठी रविवारी हलकर्णी फाट्यावर मुलाखतीचंदगड / सी. एल. वृत्तसेवा  

         वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या चंदगड तालुका कार्यकारिणीची निवड करण्यासाठी  रविवार दि. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वा. हलकर्णी फाटा ता.चंदगड येथील अजिंक्यतारा हॉटेल मध्ये कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व पश्चिम महाराष्ट्र जिल्हा प्रभारी डॉ. क्रांती सांवत यांच्या मार्गदर्शन नुसार वंचित बहुजन आघाडी चंदगड तालुका कार्यकारणी गठित करण्यात येेणार आहे.

           यासाठी तालुक्यातील इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती जिल्हा अध्यक्ष  दयानंद कांबळे, महासचिव भिमराव नंदनवाडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष सुळकुडे व जिल्हा कमिटी पदाधिकारी यांचा उपस्थित घेण्यात येणार आहेत. चंदगड तालुक्यातील इच्छुक कार्यकर्त्यांनी मुलाखतीस उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा कमिटी मार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment