कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
केंद्रीय प्राथमिक शाळा नांदवडे (ता. चंदगड) चे मुख्याध्यापक चंद्रशेखर विश्वनाथ जोशी यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव सोहळा उद्या रविवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता केंद्रीय प्राथमिक शाळा नांदवडे येथे संपन्न होत आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दयानंद गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार राजेश नरसिंगराव पाटील व माजी रोहयो मंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या शुभहस्ते जोशी यांचा सपत्नीक सत्कार संपन्न होणार आहे. यावेळी गोपाळराव पाटील, ॲड. संतोष मळवीकर, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, गटशिक्षणाधिकारी सुमन सुभेदार, सरपंच राजेंद्र कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक बाबुराव गावडे, विष्णू पाटील संचालक पारगड पतसंस्था, उद्योजक प्रल्हाद जोशी, विठ्ठल जोशी, सुनील जोशी व शाळा व्यवस्थापन समिती नांदवडे वतीने करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment