राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम 10 ऑक्टोंबर रोजी - तालुका आरोग्य अधिकारी डॉ . बी. डी. सोमजाळ - चंदगड लाईव्ह न्युज

08 October 2022

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम 10 ऑक्टोंबर रोजी - तालुका आरोग्य अधिकारी डॉ . बी. डी. सोमजाळ



तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        सोमवार दिनांक १० ऑक्टोंबर  २०२२ रोजी चंदगड तालुक्यामध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जंतनाशक मोहीम आयोजित केली असल्याची माहिती चंदगड तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी आज दिली.

          या मोहिमेमध्ये १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळी देऊन मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखणे, मुला मुलींचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा मुख्य उद्देश आहे.

        या मोहिमेमध्ये एक ते दोन वर्षे वयोगटातील बालकांना जंतनाशकाची (tab.albendazole 400mg) अर्धी गोळी व २ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना एक गोळी प्रत्यक्ष समोर खाऊ घालणार आहेत.

        या कामी सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व अशा, अंगणवाडी सेविका व शाळेतील शिक्षक यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यांचे या मोहिमेमध्ये मोलाचे सहकार्य लागणार आहे.

         सोमवार दिनांक १० ऑक्टोंबर २०२२ रोजी आपल्या मुला-मुलींना अंगणवाडीमध्ये व शाळेमध्ये हजर ठेवून या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी  चंद्रकांत बोडरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment