कोवाड (ता. चंदगड) येथील यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना आमदार राजेश पाटील |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
शेतकऱ्यांच्या घामातून ' दौलत'ची उभारणी झाली असताना आता त्याच शेतकरी व कामगारावर अन्याय होताना दिसतो.या अन्यायाच्या विरोधात आम्ही स्वस्थ बसणार नाही.' दौलत कारखाना ही तालुक्याची अस्मिता आहे,ही जीवंत ठेवण्यासाठी तसेच दौलत कारखाना कामगार व शेतकऱ्यांच्या मालकीचा राहण्यासाठी जीवाचे रान करू, असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले.
ते कोवाड (ता. चंदगड) येथील यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या ३२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष मारुती बाळेकुंद्री, अशोकराव देसाई, उपस्थित होते. सचिव सूर्यकांत पाटील यांनी अहवाल वाचन करून विविध योजनांची माहिती दिली. यावेळी सहकारात नव्याने येत असलेल्या नियामक मंडळाला सभासदांनी विरोध केला तो रद्द होण्याबाबत ठराव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष बाळेकुंद्री यांनी सभासदांना १२ टक्के दराने लाभांश देण्याचे जाहीर केले. राजू जाधव, तानाजी गडकरी, अशोक व्हन्याळकर, शिवाजी तेली यांनी चर्चेत भाग घेतला. शिवाजी पाटील, गोपाळ पाटील, भरमू निर्मळकर, बंडोपंत चिगरे, मायाप्पा कांबळे, शिवाजी नाईक, शीतल कोळुचे, जनाबाई पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन मायाप्पा कांबळे यांनी केले तर उपाध्यक्ष विष्णू आडाव यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment