हलकर्णी महाविद्यालयातील रक्तदान शिबिरात ४१ रक्तदात्यांचा सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

08 October 2022

हलकर्णी महाविद्यालयातील रक्तदान शिबिरात ४१ रक्तदात्यांचा सहभाग

रक्तदान शिबीर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

         हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत अण्णासाहेब गळतगे ब्लड बैंक गडहिंग्लजच्या वतीने घेण्यात आलेल्या  रक्तदन  शिबीरात ४१ रक्तदात्यानी रक्तदान केले.

          दरवर्षी प्रमाणे महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभागतर्फे गरजू रूग्नांना वेळोवेळी दवाखान्यामध्ये जावून रक्तदान करण्याच्या कार्यामध्ये अग्रेसर आहे. अण्णासाहेब गळतगे ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. एस. एस. विभागाचे प्रमुख प्रा. यु. एस. पाटील यांनी रक्तदानाबाबतच्या जनजागृती मोहीमेची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. डी. एस. गुरव यांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान हे पुण्यदान आहे. देशाच्या सीमेवर रात्रदिवस आपल्या सैनिकांना, अपघात ग्रस्तांना, मॅटर्निटी हॉस्पीटल, इ. सर्वांना कधीही केव्हाही रक्ताची गरज लागते. म्हणुन रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असे मत व्यक्त केले. या प्रसंगी शिवाजी विद्यापीठामध्ये झालेल्या प्री. आर. डी. परेडसाठी निवड शिबीरासाठी महाविद्यालयाची कु. अलका चौगुले या विद्यार्थीनीची निवड झाल्याबददल सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी रक्तदानाबद्दलची माहिती दिली. आपल्या मनोगतामध्ये त्यांनी मी प्रत्येक वर्षी रक्तदान शिबीरामध्ये रक्तदान करत असतो. मी अवयवदानही करणार आहे असे आव्हान करून अशा प्रकारे समाज कार्याचा वारसा प्रत्येकाने जपला पाहिजे, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर डॉ. ए. पी. गवळी, डॉ. राजेश घोरपडे, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत शेंडे इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस. विभाग प्रमुख प्रा. यु. एस. पाटील यांनी केले. रक्तदान करण्यासाठी दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर इ. मान्यवरांनी विद्यार्थ्यांबरोबर रक्तदान केले. दौलत विश्वस्त संस्थेचे पदाधिकारी एन. एस. एस. च्या प्रत्येक उपक्रमामध्ये सक्रिय सहभागी होत असतात. रक्तदान शिबीरामध्ये संस्थेचे पदाधिकारी , महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, प्रशासकीय कर्मचारी, एन. एस. एस. विभागाच्या स्वयंसेवकांनी उत्सफुर्तपणे रक्तदान करून सहभाग नोंदविला. प्रशासकीय कर्मचारी  प्रदीप सावंत, सुजित पाटील, राजू बागडी, दिलीप पाटील यांनीही मोलाचे सहकार्य केले. या रक्तदान शिबीरामध्ये ४१ रक्तदात्यानी रक्तदान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. माधुरी सुतार यांनी केले. आभार प्रा. जी. जे. गावडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment