चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा वन खाते कर्मचारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर ची ३५ वी वार्षिक सभा, स्वामी स्वरूपानंद मंगल कार्यालय कसबा बावडा, कोल्हापूर येथे अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांच्या अध्थक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली. प्रारंभी व्यवस्थापक शिवाजी जटाळे यांनी प्रास्ताविक करून अहवाल सालातील संस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला.
प्रारंभी तुळशी वृंदावनाची पूजा करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी संस्थेच्या जडणघडण व प्रगतीमध्ये विद्यमान व माजी संचालक मंडळ तसेच आजी-माजी सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांचे योगदान अनन्यसाधारण आहे, असे सांगून संस्थेच्या नफा-तोटा अहवाल वाचून दाखविला.
अहवाल सालात संस्थेची उलाढाल ७ कोटींवर गेली असून ४७.५ लाख रुपये निव्वळनफा झाला आहे. सभासदांना १० टक्के दराने लाभांश देण्याचे अध्यक्ष पाटील यांनी जाहीर केले.यावेळी सभासदांच्या विविध प्रश्न व शंकाचे निरसन करण्यात आले. तर सेवानिवृत्त वन कर्मचारी तथा सभासदांना कृतज्ञता पत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सभासदांच्या इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या पाल्यांना प्रमाणपत्र, वही, पेन, रोख रक्कम व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष बुधाजी कांबळे, संचालक जालंधर पाटील, विश्वास पाटील, सागर पटकारे, राजेंद्र सावंत, सुधीर गुरव, बळवंत महामूलकर, प्रतिभा पाटील, मनीषा देसाई यासह संचालक, सभासद कर्मचारीवर्ग उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष बुधाजी कांबळे यांनी मानले.
No comments:
Post a Comment