चंदगड तालुक्यातील हेरेसरंजाम शाही च्या वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ होण्यासंदर्भात शेतकऱ्यांचे सोमवारपासून आमरण उपोषण - चंदगड लाईव्ह न्युज

08 October 2022

चंदगड तालुक्यातील हेरेसरंजाम शाही च्या वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ होण्यासंदर्भात शेतकऱ्यांचे सोमवारपासून आमरण उपोषण


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील ५५ गावातील हेरेसरंजाम जमिनी भोगवटदार वर्ग २ च्या भोगवटदार वर्ग १ होऊन मिळणेबाबत सन १९६२ साली सरंजामशाही वतन खालसा करणेचा आदेश झाला. त्यानंतर चंदगड तालुक्यातील बर्‍याच गावातील जमिनी वर्ग २ चे वर्ग १ करण्यात आल्या ,परंतू प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि गलथान कारभारामुळे उर्वरीत ५५ गावांचा हेरेसरंजाम भोगावटदार वर्ग २ हा शेरा अध्याप ७/१२ सदरी आहे तसा आहे. याला संपूर्ण जबाबदार प्रशासनच आहे. ५५ गावातील हेरेसरंजाम जमिनी भोगावटदार २ च्या भोगावटदार १ जोपर्यंत होत नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांकडून चंदगड तहसील कार्यालयासमोर सोमवार दि.१० ऑक्टोबर पासून आमरण उपोषण करणार आहेत. याबाबतचे निवेदन अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी केली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
     चंदगड तालुक्यातील ५५ गावातील शेतकऱ्यांच्या जिवन मरणाचा प्रश्न बनलेल्या हेरे सरंजाम वर्ग २ असलेल्या जमिनी वर्ग १ करणेचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबीत आहे सन २००१ साली शासन निर्णय होवून हा प्रश्न सोडवणेत आला होता परंतू महसूल खात्यातील लाल फितीच्या कारभारामुळे हा प्रश्न शासनाने सोडवून ही त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही . वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्यासाठी शेतकऱ्यांना विनाकारण प्रांत कार्यालय व तहसिल कार्यालय हेलपाटे मारावे लागतात हा प्रश्न सोडवणेसाठी तात्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई सो यांनी पुढाकार घेतला होता . त्यांनी २६ जानेवारी २०२० पर्यंत हा प्रश्न संपवण्याचे आदेश देणेत आले होते पण कोरानाच्या काळात दोन वर्षे संबंधीत काम रखडले गेले . दुर्देवाने त्याची बदली झाली त्यानंतर बरेच शेतकऱ्यांनी, सामाजीक कार्यकत्यांनी या बाबीकडे प्रशानसनाचे लक्ष वेधले आहे तरी सुध्दा प्रशासनाने अजून याचा विचार केलेला नाही. आणि जाणूनबुजून चालढकलपणा करत आहेत. जिल्हाधिकारी यांना विनंती करतो की , आपण या प्रकरणी जातीने लक्ष घालून ० ९ ऑक्टोबर पुर्वी हा प्रश्न सोडवणेसाठी ठोस उपाययोजना न आखल्यास व तसा वर्ग २ चे वर्ग १ करणेबाबत चा आदेश न दिल्यास नाईलाजाने १० ऑक्टोबर २०२२ रोजी पासून आमरण उपोषण तहसिलदार कार्यालय चंदगड येथे आमरण उपोषण करण्याचा निर्णय महादेव मंडलीक - पाटील, अनिल रेंगडे, धोंडीबा चिमणे, राजू कापशे, राजाराम वाईंगडे या शेतकऱ्यांनी घेतला आहे.


No comments:

Post a Comment