मुद्देमालासह गोवा बनावटीची १० लाखाची दारू जप्त, चंदगड पोलीसांची मोठी कारवाई, कोठे केली कारवाई.......वाचा........ - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2022

मुद्देमालासह गोवा बनावटीची १० लाखाची दारू जप्त, चंदगड पोलीसांची मोठी कारवाई, कोठे केली कारवाई.......वाचा........

चंदगड पोलिसांनी कारवाई करुन जप्त केलेली साडेपाच लाखांची गोवा बनवाटीची दारु.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           हेरे-पारगड रस्त्यावर असलेल्या वाघोत्रे (ता. चंदगड) येथील बसस्थानकानजिक चंदगड पोलिसानी बोलेरो गाडी अडवून गोवा बनावटीची मॅकडॉल, इम्पेरीअल ब्ल्यू, गोल्डन आईस, आदी  कंपन्याची ५,४६,५५० दारू व दारू वाहतुक करणारी ५,००००० रू किंमतीची बोलेरो चारचाकी गाडीतून अशा एकूण  १०,४६,५५० रू.मुद्देमाल जप्त केला. 

         चंदगड पोलीसांनी रविवार (दि.१६) दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. या प्रकरणातील एक आरोपी मात्र फरार झाला. बाळासाहेब आश्रुबा केदार (वय २७ वर्षे रा. गप्पेवाडी ता. केज जि. बीड) व सुरेश गोपाळ गरे (रा. बाणेवाडी जि.बीड) या दोघा आरोपीवर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     याबाबत पोलिसांतून मिळालेली माहीती अशी की, `पारगड -मिरवेल रस्त्यावरुन हेरा गावाकडे महिंद्रा बोलेरो गाडी नं एम एच-२६, ए एफ-०३२५ या गाडीतून गोवा बनावटीची दारू वाहतुक होत असलेची खबर चंदगड पोलिसांना खास खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पोलीसानी सापळा रचून दिड वाजण्याच्या सुमारास वाघोत्रे येथे गाडी पकडली. मात्र याचवेळी गाडीतून उडी टाकून सुरेश गरे हा  आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५,९०,१०८ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पो. नि. संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखालील पो. हे. काॅ. डी. एन. पाटील करत आहेत.

No comments:

Post a Comment