माडखोलकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन व माझी वसुंधरा अभियान संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

16 October 2022

माडखोलकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन व माझी वसुंधरा अभियान संपन्नचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रविवारी वाचन प्रेरणा दिन, जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला व माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रम कांबळे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासत विविध विषयावरील सुवचने, कविता, लेख, चारोळ्या, शेरोशायरी, घोषवाक्य इत्यादींचे उत्स्फूर्त वाचन केले.

         मार्गदर्शक डॉ. एन. के. पाटील यानी वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. नवी पीढी मोबाईल व इंटरनेटच्या महाजाळात फसत चालली आहे. पुस्तक वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. जर वाचन व उच्च शिक्षणापासून नवी पीढी वंचित राहिली तर पुन्हा कांही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी यायला उशीर लागणार नाही. त्यामुळे सावध व्हा वेळीच शहाणे व्हा असा सूचक सल्ला दिला. 

         प्रा. संजय पाटील यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये ``राष्ट्रीय सेवा योजना आपल्या सर्वांगिण व्यक्तीमत्वाचा विकास करण्यास शिकविते त्याचा कॉलेज जीवनात लाभ घ्या.श्रमाची लाज बाळगू नका. वाचाल तरच वाचल. काय वाचायचे, कसे वाचावे याची प्रेरणा घेऊन ध्येय पूर्ति करा असे त्यानी सांगितले.``

         स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसर कचरा व प्लास्टिक मुक्त केला. वृक्ष संवर्धन मोहिमेंतर्गत तन निर्मूलन, रस्ता खड्डे भरणे, निंदनी, रिंगण करणे, स्वच्छता इत्यादी अनेक कामे श्रमदानातून पार पाडली. प्रकल्प अधिकारी प्रा संजय पाटील, डॉ एन. के. पाटील, प्रा एस. एम. पाटील, विरधवल मुळीक, ज्ञानेश्वर सुतार यांनी उपक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन श्रेया सुतार हिने केले तर आभार स्वप्निल गावडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment