माणसे वाचायला शिका - प्रा. किसनराव कुराडे, हलकर्णी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

18 October 2022

माणसे वाचायला शिका - प्रा. किसनराव कुराडे, हलकर्णी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन संपन्न



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासारखी माणसे भारतातच जन्माला येतात . त्यांचा सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे झालेला प्रवास हा वाचन, संशोधन, लेखन यामधूनच झाला आहे. या व्यक्ती अनुकरणीय आहेत. आज वाचनाची माध्यमे बदलली आहेत. वाचायला शिकला तर पुढील पिढी वाचू शकेल. मोबाईलचा वापर योग्य कामासाठी करा', असे प्रतिपादन शिवराज विद्या संकुल, गडहिंग्लजचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरूवर्य गुरूनाथ विठठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथालय विभागामार्फत आयोजित वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक  गोपाळराव पाटील उपस्थित होते . 

         सुरुवातीस भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. अनिल गवळी यांनी करून दिला. 

           प्रा .कुराडे पुढे म्हणाले, 'जग जिंकण्याची संधी शिक्षणात आहे. पुस्तके वाचा ज्ञान मिळेल. चंदगडच्या मातीत प्रेरणा मिळते. मातीशी असलेल नात टिकवणे हे चंदगडच वैशिष्ट ' ! अध्यक्षीय मनोगतात गोपाळराव पाटील म्हणाले, 'वाचनातून शहाणपण मिळते. विविध क्षेत्रात विद्यार्थी चमकत आहेत हे कौतुकास्पद आहे. सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांनी करावे. जीवनार्थी शिक्षण घ्या, वाचनामुळे समृध्दता येते.

        यावेळी व्यासपीठावर दौलत विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत गोपाळराव पाटील यांचे हस्ते करण्यात आले, तर शिवराज विद्या संकुलाच्यावतीने प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर व कार्यालय अधिक्षक प्रशांत शेंडे यांचा सत्कार प्रा. किसनराव कुराडे यांनी केला .यावेळी प्रा. प्रमोद होनगेकर, सर्व प्राद्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्याथी- विद्यार्थिनी  उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रा वंदना केळकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. एस. एन. पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment