अथर्व - दौलत साखर कारखान्यामध्ये पहिल्या 11 साखर पोत्यांचे पुजन, ७ लाखांचे उदिष्ट, ऊस पाठविण्याचे आवाहन... - चंदगड लाईव्ह न्युज

16 November 2022

अथर्व - दौलत साखर कारखान्यामध्ये पहिल्या 11 साखर पोत्यांचे पुजन, ७ लाखांचे उदिष्ट, ऊस पाठविण्याचे आवाहन...

अथर्व - दौलत साखर कारखान्यामध्ये पहिल्या 11 साखर पोत्यांचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचारी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           अथर्व - दौलत साखर कारखान्यातील सन 2022-23 गाळप हंगामातील पहिल्या 11 साखर पोत्यांचे पुजन आज बुधवारी (ता. १६) कार्यक्रम युनिट हेड ए. आर. पाटील व सर्व विभागप्रमुख यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी चेअरमन अथर्व इंटरट्रेड प्रा.लि. मानसिंग खोराटे  यांच्या वतीने ए. आर. पाटील यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुक कंत्राटदार व सर्व कर्मचारी यांना संबोधीत केले. यावेळी त्यांनी आपण पिकविलेला संपुर्ण ऊस आमच्या अथर्व दौलत साखर कारखान्याकडे गाळपासाठी पाठवून सहकार्य करावे असे आवाहन केले.

        अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेड लिज्ड युनिट दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. हलकर्णी या कारखान्याचा 2022-23 चा चौथा गळीत हंगाम जोमाने सुरु आहे. कार्यक्षेत्रातील व संलग्न कार्यक्षेत्रातील कारखान्याकडे नोंद केलेला ऊस गळीतासाठी येत आहे. कारखाना यावर्षी एफ. आर. पी. निश्चित दरापेक्षा जादा दर देवून अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेड कंपनीने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. या येणाऱ्या ऊसासाठी प्रति मे. टन रु.3001/- प्रमाणे दर जाहिर करुन ऊस बिले वेळेत अदा करणार आहे.             यावर्षी व्यवस्थापनाने कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस गाळप करणेचे ठरवले असून ७ लाख मे. टन इतके ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवले आहे. मागील गळीत हंगामातील गाळप विचारात घेता यावर्षी व्यवस्थापनाने वाढीव गाळप क्षमता व योग्य नियोजन यामूळे कमी कालावधीत जास्तीत जास्त ऊस गाळप होणार आहे. तसेच चालू गळीत हंगाम सुरळीत पार पाडणेसाठी अधिकारी, कर्मचारी यांनी मोठया जोमाने काम करावे असे मार्गदर्शन युनिट हेड ए. आर. पाटील यांनी केले. 

         कार्यक्रमावेळी सेक्रेटरी विजय मराठे, चिफ इंजिनिअर तळदंगे, चिफ केमिस्ट सांळुखे, केन हेड सदाशिव गदळे, फायनान्स मॅनेजर चव्हाण, सुरक्षा अधिकारी साळोखे, प्रभाकर पाटील, मनोहर झेंडे, पांडूरंग गावडे, हणमंत पाटील, सुबराव गुडाजी व सर्व अधिकारी व कामगार आणि थायसन क्रुपचे प्रोजेक्ट हेड कोलवालकर, मिल एक्सपर्ट शरद पाटील व सर्व कंत्राटदार मोठया संख्येने उपस्थित होते. आभार जनसंपर्क अधिकारी दयानंद देवाण यांनी मांडले.



No comments:

Post a Comment