चंदगड येथील फादर अग्नेल स्कूलमध्ये आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2022

चंदगड येथील फादर अग्नेल स्कूलमध्ये आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद

चंदगड येथील फादर अग्नेल स्कूलमध्ये आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये पाहणी करताना चंदगड न्यायालयाचे सहाय्यक न्यायाधीश चारुदत्त शिपकुले, सोबत मुख्याध्यापक फादर विल्सन पॉल.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       आजचा विद्यार्थी उद्याचा दिशादर्शक असतो, विद्यार्थ्यांच्या अंगी  वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा विद्यार्थ्याप्रति विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी. हा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून चंदगड येथील फादर अग्नेल  स्कूलने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाला तालुक्यातील इतर शाळा, विद्यालयांनी सहभाग घेतला. त्यामुळे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन चंदगड न्यायालयाचे सहाय्यक न्यायाधीश चारुदत्त शिपकुले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी फादर अग्नेल स्कूलचे मुख्याध्यापक फादर विल्सन पॉल होते.

   प्रथमता मान्यवरांचे व सहभागी विद्यार्थी व शाळा, शिक्षक प्रतिनिधींचे स्वागत फादर मिलाग्रे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. या विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध उपकरणे करून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला होता. सहभाग नोंदवला होता.   

           यामध्ये सौर ऊर्जा, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कचरा निर्मूलन, सेंद्रिय शेती, पाणी वाचवा देश वाचवा, झाडे लावा पर्यावरण वाचवा, पवन ऊर्जेपासून घरगुती उपकरणांचा वापर, आधुनिक रोबोट यंत्रणा,टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू, प्लास्टिक बंदी, बायोगॅस प्रकल्प, पवन उर्जेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक मोटर, स्वच्छ शहर, सोलार  इलेक्ट्रिक मोटार गाडी अशी अनेक उपकरणांची निर्मिती करून त्याचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. या विज्ञान प्रदर्शन मध्ये दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड, सेंट अँथोनी स्कूल  वैतागवाडी, सेंट  स्टीफन इंग्लिश मीडियम स्कूल चंदगड, संजय गांधी विद्यालय नागणवाडी, स्वामी विवेकानंद स्कूल कोवाड, उर्दू स्कूल चंदगड, कार्मेल आशिष कॉन्व्हेंट स्कूल, अडकुर, श्री रामलिंग हायस्कूल व जुनिअर कॉलेज तुडये अशा प्रकारे अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. 

लहान गट इयत्ता चौथी पाचवी - प्रथम क्रमांक -फादर आग्नेल स्कूल चंदगड, द्वितीय क्रमांक -स्टीफन इंग्लिश मीडियम स्कूल चंदगड तर  तृतीय क्रमांक- सेंट अँथोनी स्कूल वैतागवाडी, 

द्वितीय गट इयत्ता सहावी ते सातवी - प्रथम क्रमांक फादर अग्नील स्कूल चंदगड, द्वितीय क्रमांक कारमेल आशिष कॉन्व्हेंट स्कूल अडकुर, तृतीय क्रमांक सेंट अँथोनी स्कूल वैतागवाडी

गट क्रमांक तीन इयत्ता आठवी  ते नववी  - प्रथम क्रमांक- दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड, द्वितीय क्रमांक सेंड स्टीफन इंग्लिश मीडियम स्कूल चंदगड, तर तृतीय क्रमांक फादर आग्नेल स्कूल चंदगड अशा प्रमाणे विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले. 

       या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक वितरण परीक्षक टी. टी. बेरडे, व्ही. टी. पाटील व एस. पी. माळकरी यांच्या हस्ते देण्यात आले. त्याचबरोबर इतर सहभागी शाळेंना व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन त्यांचाही  गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील  शाळा विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे आभार फादर विल्सन पॉल यांनी मानले.

No comments:

Post a Comment