ऊस तोड कामगार देतो असे सांगुन मुकदामाकडून चंदगड तालुक्यातील एकाची ७ लाख १६ हजारांची फसवणुक, मुकादमाविरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद.... - चंदगड लाईव्ह न्युज

15 November 2022

ऊस तोड कामगार देतो असे सांगुन मुकदामाकडून चंदगड तालुक्यातील एकाची ७ लाख १६ हजारांची फसवणुक, मुकादमाविरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद....चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           ऊस तोड कामगार देतो असे सांगुन वेळोवेळी पैशाची मागणी केली. मात्र ऊस तोडीसाठी मजुर (टोळी) दिलेली नाही व पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे फिर्यादी शरद सुबराव गावडे (वय - ३२, धंदा शेती, रा. मु. पो. आसगाव ता. चंदगड जि. कोल्हापुर) यांनी मुकदम राम भिमराव राठोड (रा. भिलडोंगर (वरचा तांडा) ता. मानोरा जि. वाशिम) यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. सन २०१८ ते दि. १९/१०/२०२० या दरम्यान मुदतीत वेळोवेळी हि घटना घडली. यामध्ये शरद यांनी एकूण ७ लाख १६ हजार रुपयांची फसवणुक झाल्याची फिर्याद चंदगड पोलिसात दिली आहे. 

       यासंदर्भात पोलिसांतून मिळालेली माहीती अशी - मुकादम राम भिमराव राठोड यांनी शरदर गावडे यांच्याकडे ऊसतोडीसाठी मजुर (टोळी) देतो असे सांगून वेळोवेळी सन २०१८ ते दि. १९/१०/२०२० या दरम्यान मुदतीत वेळोवेळी आसगाव येथे घरी, स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा कोवाड व रवळनाथ पतसंस्था चंदगड येथे आर. टी. जी. एस. गुगल पे व फोन पे व्दारे रक्कम 6,30,000/- रुपये मुकादम यांनी आपल्या बँक ऑफ बडोदा शाखा वाशिमच्या अकाऊंट नंबरवर मागवून घेतले. मात्र ऊस तोडीसाठी टोळी दिली नाही. तसेच सन २०१८ सालची शिल्लक रक्कम १,१३,०००/- रुपये अशी एकुन ७,१६,०००/- रुपये फिर्यादी यांना परत न देता फसवणुक केली. त्यामुळे फिर्यादी शरद गावडे यांनी याबाबतची तक्रार चंदगड पोलिसात दिली आहे. मुकादम राम भिमराव राठोड यांच्या विरोधात चंदगड पोलिसांत चंदगड पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ३३३/२०२२ भा.दं.वि.सं. कायदा कलम ४२० प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास पो.स. ई. नाईक करत आहेत.


 

No comments:

Post a Comment