गुडेवाडी येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतली आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉ. परशराम पाटील यांची भेट - चंदगड लाईव्ह न्युज

20 November 2022

गुडेवाडी येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतली आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉ. परशराम पाटील यांची भेटचंदगड/ सी. एल. वृत्तसेवा
        कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी शनिवारी आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्रज्ञ डॉ. परशराम पाटील यांची गुडेवाडी (ता. चंदगड) येथे भेट घेतली.      
      यावेळी के. एल. ई. हॉस्पिटलच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेची व रुग्ण संपर्क व्यवस्थेची माहिती के. एल. ई.  हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी ( PRO) सुनील शिंदे यांनी दिली. 

     डॉ. प्रभाकर कोरे व डॉ. परशराम पाटील यांच्या समन्वयातून तालुक्यातील रुग्णांना सदर सुविधा उपलब्ध होत असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी डॉ. प्रभाकर कोरे, डॉ. परशुराम पाटील व के. एल. ई व्यवस्थापनाने ग्रामीण भागात दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेबद्दल विशेष कौतुक केले. यावेळी चंदगड तालुका गट विकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, पी. आर. ओ. रोहित पाटील, संदीप गावडे, सुनील वायदंडे, तेजस सरशेट्टी व गुडेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:

Post a Comment