तेऊरवाडी येथे मोलॅशिस वाहतूक करणाऱ्या टँकरला अपघात, सुदैवाने मोठा अनर्थ टळला, टँकर घरात घुसता-घुसता थांबला - चंदगड लाईव्ह न्युज

20 November 2022

तेऊरवाडी येथे मोलॅशिस वाहतूक करणाऱ्या टँकरला अपघात, सुदैवाने मोठा अनर्थ टळला, टँकर घरात घुसता-घुसता थांबला

घरात घुसता घुसता थांबलेला टँकर
तेऊरवाडी /सी. एल. वृत्तसेवा
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे हेमर  साखर कारखान्याकडून देवगडला मोलॅसिस वाहतूक करणाऱ्या टँकरला अपघात झाला. सुदैवाने हा टँकर एका घरात घुसता - घुसता वाचला.
    गेले दोन दिवस कोवाड - नेसरी मार्गावरून देवगड ला मोलॅसिस वाहतूक चालू आहे. सांगली च्या एका बड्या ठेकेदाराकडून ही वाहतूक चालू आहे . आज एका मागोमाग एक असे टँकर येत असताना तेऊरवाडी गावा जवळ नवीन वसाहतीच्या  चढणीवर ते चढू शकले नाहीत. काही टँकर चालकानी  ट्रॅक्टरचा आधार घेऊन टँकर चढवले. पण MH 10 CR 7350 या टँकर चालकाने ट्रँक्टरचा आधार न घेता चढण चढण्याचे धाडस केले आणि अपघात झाला चढण न चढल्याने हा टँकर उताराने मागे जाऊन अर्जुन पाटील यांच्या घरामध्ये घुसतान अगदी फूटभर अंतरावर थांबला.   
        वाहनाची क्षमता २८ टनांची असताना त्यापेक्षा जास्त वजनाच्या मोलॅसिसची वाहतूक केली जात असल्याने असल्याने असे अपघात घडत आहेत. गतवर्षी याच जागी असाच मोलॅसिस वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन येथे सांडलेल्या मोलॅसिसमध्ये  गाड्या घसरून अनेक अपघात झाले होते. यावेळी बेळगावच्या दोन महिलानी रास्ता रोको आंदोलनही केले होते. पण पून्हा येथे असाच अपघात होऊ नये यासाठी या अतिरीक्त नियम बाह्य मोलॅसिस वाहतूकीवर निर्बंध घालने गरजेचे आहे.


No comments:

Post a Comment