तेऊरवाडीच्या रामराव गुडाजी यांचे प्रौढ नागरिक क्रीडा स्पर्धेत यश, चंदगड तालूक्याचा नावलौकिक वाढला - चंदगड लाईव्ह न्युज

19 November 2022

तेऊरवाडीच्या रामराव गुडाजी यांचे प्रौढ नागरिक क्रीडा स्पर्धेत यश, चंदगड तालूक्याचा नावलौकिक वाढला

 

वयाच्या ७२ व्या वर्षी धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेले रामराव गुडाजी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
शिवाजी विद्यापिठ कोल्हापूर येथे यश मास्टर्स फौंडेशन यांच्या कडून घेण्यात आलेल्या प्रौढ नागरिक वय वर्षे ७१ ते ७५ या वयोगटात तेऊरवाडी (ता चंदगड) येथील रामराव गुंडू गुडाजी (वय ७२ वर्षे) यांनी उज्वल यश संपादन केले.

यावेळी निवृत्त अध्यापक रामराव गुडाजी यानी ४०० व ८००  मिटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. तर भालाफेक मध्ये  द्वितिय क्रमांक मिळवला. यापूर्वी हैदराबाद येथे झालेल्या विद्यापिठ स्तरीय धावण्याच्या स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक मिळवला होता. तसेच शिक्षण क्षेत्रातील  उत्कृष्ठ कार्याबद्दल नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सन्मान Friendly , सिंधुदूर्ग जिल्हा आदर्श शिक्षक व महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सिंधुदूर्ग जिल्हा कुस्ती संघटनेची स्थापना करून हजारो विद्यार्थ्याना क्रीडा क्षेत्रात घडवणाऱ्या रामराव गुडाजी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी मिळवलेले उज्वल यश आजच्या युवकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. या यशाबदल तेऊरवाडी ग्रामस्थानी रामराव गुडाजी यांचा सन्मान केला. श्री गुडाजी यांची यवतमाळ येथे होण्याऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.





No comments:

Post a Comment