महागाव येथील संत गजाननमध्ये होणार मेंदू विकार रुग्णांवर उपचार - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2022

महागाव येथील संत गजाननमध्ये होणार मेंदू विकार रुग्णांवर उपचार

महागाव / सी. एल. वृत्तसेवा

      महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मेंदूविकार रुग्णांवर निदान व उपचार होणार आहे. प्रसिद्ध मेंदूविकार तज्ञ डॉ. सागर जाबिळकर हे दर शुक्रवारी  रुग्न तपासण्यासाठी हजर असणार आहेत. 

        यामध्ये मेंदूच्या गाठी व रक्तस्त्राव, मणक्याचे विकार व गाठी, फिट व रक्तवाहिनीच्या अन्य विकारावर उपचार व शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य व कर्नाटकचे सुवर्ण आरोग्य सुरक्षा योजनेतून मोफत होणार आहे. तरी रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.यशवंत चव्हाण यांनी केला आहे.



No comments:

Post a Comment