अथर्व - दौलत साखर कारखान्याची १५ नोव्हेंबर २०२२ अखेरची ऊस बिले शेतकऱ्यांच्या बैंक खात्यावर जमा - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2022

अथर्व - दौलत साखर कारखान्याची १५ नोव्हेंबर २०२२ अखेरची ऊस बिले शेतकऱ्यांच्या बैंक खात्यावर जमा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व दौलत कारखान्याने १५ नोव्हेंबर २०२२ अखेर  गाळप केलेल्या ऊसाची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहीती दिली.अथर्व चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली..कारखान्याचा २०२२-२३ चा चौथा गळीत हंगाम जोमाने सुरु असून अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेड लिज्ड युनिट दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याने यावर्षी एफआरपी निश्चित दरापेक्षा जादा दर देवून आलेल्या ऊसासाठी एकरकमी प्रति मे.टन रु.३००१/- प्रमाणे दर दिलेला आहे. 


 
          कारखाना प्रशासनाने यावर्षी आठ दिवसात बिले देणेची परंपरा कायम ठेवून वेळेत किंबहुना वेळेच्या अगोदरही शेतकऱ्यांच्या आलेल्या ऊस बिलाच्या पूर्ण रक्कमा बँकामध्ये पाठविणार आहोत. तसेच इंजिनिअरिंग, उत्पादन आणि शेती विभागाच्या अधिकारी व कामगारांच्या योग्य नियोजनामुळे कारखान्याचे गाळप प्रगती पथावर सुरु आहे. ऊस उत्पादक शेतकरी तोडणी वाहतुक यंत्रणा व कामगार यांच्या विश्वास व सहकार्यामुळे यावर्षीचे ७ लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार असेही खोराटे यांनी व्यक्त करुन, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपुर्ण ऊस अथर्व दौलत कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. यावेळी कारखाना संचालक पृथ्वीराज खोराटे, विजय पाटील या सह कारखान्याचे खातेप्रमुख उपस्थित होते.No comments:

Post a Comment