वाचन हीच ज्ञानगंगेची खरी संपत्ती - साहित्यिक सुनील चव्हाण, हलकर्णी महाविद्यालयात 'लेखक आपल्या भेटीला ' उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2022

वाचन हीच ज्ञानगंगेची खरी संपत्ती - साहित्यिक सुनील चव्हाण, हलकर्णी महाविद्यालयात 'लेखक आपल्या भेटीला ' उपक्रम

हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात साहित्यिक सुनील चव्हाण यांचा सत्कार करताना प्राचार्य डाॅ. अजळकर बाजूला प्राध्यापक वर्ग 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          वाचन म्हणजे विकास आणि  ज्ञानगंगा. आयुष्य समृद्ध करायचे तर ज्ञान संपादनाचा मोठा प्रवास करावा लागतो. शिक्षण आणि वाचन हीच खरी गुंतवणूक आहे. यासाठीच मोठयांची चरित्रे, त्यांचा जीवनप्रवास, त्यांचा व्यासंग आणि आयुष्याला सामोरे जाण्याची तीव्र आसक्ती समजून घ्यायला हवी.' असे प्रतिपादन  साहित्यिक सुनील चव्हाण (नेवरी) यांनी केले. ते. हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सांस्कृतिक  विभागामार्फत आयोजित  'लेखक आपल्या भेटीला ' उपक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर होते.

          प्रारंभी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजळकर यांनी शाल व वार्षिक अंक देऊन  पाहुण्यांचे स्वागत केले.

        यावेळी सुनील चव्हाण यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. शिवाय कॉलेज परिसर, ग्रंथालय, अशा अनेक ठिकाणी भेट दिली. कार्यालयीन अधीक्षक श्री प्रशांत शेंडे, प्रा. अनंत कलजी, ग्रंथपाल वंदना केळकर, प्रा. यु. एस.पाटील, डॉ. राजेश घोरपडे, प्रा. एस. डी. तावदारे, अल्ताफ मकानदार, युवराज रोड, परसू नाईक आदी उपस्थित होते. आभार प्रा. वसंत पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment