कोवाड महाविद्यालयातील आंतरविभागीय योगासना स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून संघ सहभागी होणार.... - चंदगड लाईव्ह न्युज

23 November 2022

कोवाड महाविद्यालयातील आंतरविभागीय योगासना स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून संघ सहभागी होणार....



तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत अंतर विभागीय योगासन स्पर्धा कोवाड (ता. चंदगड) येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात  २४ ते २५ नोव्हेबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. 

          गुरूवार दि. २४ रोजी सकाळी १० वा. या स्पर्धांचे उदघाटन भरत कुंडल (ओलम ऍग्रो) चे युनिट हेड यांच्या हस्ते  डॉ. ए. एस. जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली एम. व्ही. पाटील, दयानंद सलाम, प्राचार्य एम. एस. पवार  यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या साठी  प्रा. एस. जी. धुरी निवड समिती चेअरमन डॉ. एस. ए. खराडे -सदस्य, श्रीमती स्मिता कुंभार, सदस्य -विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतील तर डॉ. आर. डी. मगदूम हे स्पर्धा निरीक्षक म्हणून नियुक्त आहेत.

        सदर योगासने स्पर्धा महिला आणि पुरुष गटात होतील. स्पर्धा संयोजन  कोवाड महाविद्यालयाकडे आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून संघ सहभागी होत आहेत. यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एम. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शारिरिक संचालक प्रा. आर. टी. पाटील यांनी सर्व कार्यक्रमासाठी विविध समिती गठीत करून सुसूत्रबध्द  तयारी केली आहे. योगासने स्पर्धातुन ऑल इंडियासाठी टीम निवडली जाणार आहे. समारोप कार्यक्रम २५ नोव्हे रोजी महाविद्यालयात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिततीत संपन्न होणार आहे.

No comments:

Post a Comment