घनकचरा नव्हे 'धन' कचरा व्यवस्थापन काळाची गरज - अनिल चौगुले - चंदगड लाईव्ह न्युज

21 November 2022

घनकचरा नव्हे 'धन' कचरा व्यवस्थापन काळाची गरज - अनिल चौगुले

 


चंदगड/ सी. एल. वृत्तसेवा 

"माणसाला जगण्यासाठी केवळ अन्न, वस्त्र, निवारा या किमान गरजा पुरेशा नसून चांगले पर्यावरण असणे देखील महत्वाचे आहे. प्रदुषणास घरगुती कचरा हा मोठा घटक आहे. याचे योग्य व्यवस्थापन केल्यास हाच घनकचरा आपल्याला धनकचरा म्हणून उपयोगी पडू शकतो व प्रदुषण थांबू शकते. "असे प्रतिपादन निसर्गमित्रचे संस्थापक अनिल चौगुले यांनी केले.


 चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलने पर्यावरण पुरक विविध उपक्रम राबवल्याने  कोल्हापूर येथील निसर्गमित्र या संस्थेद्वारे दि न्यू इंग्लिश स्कूलची पर्यावरण पुरक शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे.


        यावेळी निसर्गमित्रचे अनिल चौगुले यांनी कचऱ्यापासून सेंद्रिय खत  व बायोगॅस निर्मिती रद्दी कागदाच्या व जून्या साडयांच्या कापडी  पिशव्या, निर्माल्यापासून रंग निर्मिती अशा विविध उपक्रमांची माहिती दिली.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याद्यापक एन. डी. देवळे होते. पर्यावरण पुरक शाळेच्या उपक्रमाचे  समन्वयक संजय साबळे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला टी. एस. चांदेकर, एम. व्ही. कानूरकर, शरद हदगल उपस्थित होते.



No comments:

Post a Comment