उत्तम आरोग्यासाठी स्वच्छतेची काळजी घ्या - डॉ. एस. एम. गायकवाड - चंदगड लाईव्ह न्युज

21 November 2022

उत्तम आरोग्यासाठी स्वच्छतेची काळजी घ्या - डॉ. एस. एम. गायकवाडचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        सुदृढ व उत्तम आरोग्य हा मानवी जीवनाचा अमूल्य ठेवा आहे, तो जतन करण्यासाठी प्रत्येकाने आपला आहार-विहार, आचार-विचार व मन यावर नियंत्रण ठेवून पर्यावरणाशी प्रामाणिक राहून स्वच्छतेची कास धरावी जीवन सुंदर व आनंददायी बनेल असे मत वैद्यकीय अधिक्षक डॉ. एस. एम. गायकवाड अधिकारी वर्ग -१ ग्रामीण रुग्णालय, चंदगड यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. ते माडखोलकर महाविद्यालय, चंदगड राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित *स्वच्छता अभियान व मानवी आरोग्य* या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. प्राथमिक आरोग्य केंद्र हे सर्व सामान्य माणसांना मोफत आरोग्य सुविधा व सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर आहे, सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व आरोग्य सांभाळावे असे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.

    *स्वच्छ भारत अभियान* अंतर्गत आयोजित केलेल्या या मोहिमेत NSS स्वयंसेवकांनी ग्रामीण रुग्णालय परिसर स्वच्छता, शव विच्छेदन कक्ष व रुग्णालयातील इतर कक्षांची स्वच्छता केली. रुग्णालयाच्या विविध कक्षांची व आरोग्य सेवा-सुविधांची माहिती करून घेतली. सर्व स्वच्छतेनंतर अभियान संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन प्रकल्प अधिकारी प्रा. संजय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा ए. डी. कांबळे व आभार प्रा व्हि. के. गावडे यांनी मानले.
No comments:

Post a Comment